महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'..तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करू' - पुणे पोलीस कारवाई

अंत्यविधीला 100 ते 125 दुचाकीवरून रॅली काढण्यात आली होती. शहरात शनिवारी कडक लॉकडाऊन असतानाही हा प्रकार घडला होता. याप्रकरणी नंतर कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 150 ते 200 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत राहिल्या तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करताना मागे पुढे पाहिले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अजित पवार
अजित पवार

By

Published : May 22, 2021, 5:31 AM IST

पुणे -पुण्यात सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर बालाजीनगर ते कात्रज स्मशानभूमीदरम्यान त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्यविधीला 100 ते 125 दुचाकीवरून रॅली काढण्यात आली होती. शहरात शनिवारी कडक लॉकडाऊन असतानाही हा प्रकार घडला होता. याप्रकरणी नंतर कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 150 ते 200 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत राहिल्या तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करताना मागे पुढे पाहिले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अजित पवार म्हणाले, की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली तेथील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचा दुकाचीच्या क्रमांकावरून शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात आले नाही. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अशाप्रकारची बाब कायद्याला धरून नाही असा संदेश जाईल आणि समाजात काही प्रमाणात बदल होईल असे वाटते. जर बदल झालाच नाही तर संबंधित पोलीस यंत्रणेने कठोर भूमिका घेतली पाहिजे, नाहीतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मागे पुढे पाहिले जाणार नाही.

दरम्यान सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांवर सर्व स्तरातून टीका झाली होती. एका गुंडाच्या अंत्यविधीला कोरोना काळात गर्दी जमल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांची धरपकड सुरू करत 106 अटक करत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली. तर ज्या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही रॅली निघाली तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघांची बदली करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details