महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

OBC Reservation : कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही - अजित पवार

ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) म्हणाले, की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आम्ही मिळून सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे तिळमात्र शंका बाळगू नका.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Sep 4, 2021, 2:54 PM IST

Updated : Sep 4, 2021, 3:02 PM IST

बारामती - सध्या राज्यात ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)चा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका राज्य सरकारसह सर्वच पक्षांनी मांडली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) म्हणाले, की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आम्ही मिळून सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे तिळमात्र शंका बाळगू नका. कोणत्याही मागासवर्गीय, अल्पसंख्याक, बहुजन वा ओबीसी अशा कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार

भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. तालुक्यातील कटफळ या गावात ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यात गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

'पवार साहेबांचे काम पुढे न्या'

पवार पुढे म्हणाले, की कोणत्याही समाज घटकावर अन्याय होऊ न देता सर्वच समाजाला पुढे घेऊन जाण्याचे जे गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी केले तेच काम पुढे नेटाने घेऊन जाण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 4, 2021, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details