महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 5, 2020, 7:30 PM IST

ETV Bharat / state

'पीडितेलाच मारून टाकण्याची विकृती उन्नावच्या घटनेनंतर फोफावली'

गुन्हेगार हे पुरावाच नष्ट करण्याच्या हेतूने पीडितेच्या जीवावर उठले आहेत. या घटना रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे आले पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे

पुणे - हिंगणघाटच्या जळीत प्रकरणानंतर औरंगाबाद आणि इतर ठिकाणीही अशा घटना घडत आहेत. समाजात प्रचंड प्रमाणात हिंसक भावना वाढते आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये पीडितेलाच मारून टाकण्याची विकृती उन्नावच्या घटनेनंतर फोफवलेली दिसते. या घटनांमधील गुन्हेगार हे पुरावाच नष्ट करण्याच्या हेतुने पीडितेच्या जीवावर उठले आहेत. या घटना रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे आले पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे

हिंगणघाट, औरंगाबाद आणि काश्मीर येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना का घडतात, याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर अशा गुन्ह्यातील खटले लवकरात लवकर न्यायालयात निकाली लावावे. राज्य सरकारने या घटनांना गंभीरपणे घेतले असून यातील दोषींवर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली.

हेही वाचा -..तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

ABOUT THE AUTHOR

...view details