पुणे : प्रज्ञा सातव यांच्यावर काल तर, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावरती काही लोकांनी हल्ला केला होता. त्यावर बोलताना अजित दादा पवार म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यालाही तेवढेच महत्त्व आहे. जेवढे सत्ताधारी पक्षाला आहे. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीवर हल्ला होणे हे चुकीचे आहे असे पवार म्हणाले.
हल्ला करणारा मास्टरमाईंड कोण? : एक लोकप्रतिनिधी तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे याच्या मास्टरमाईंचा शोध लावून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज पुण्यात देवेंद्र फडवणीस यांना केली आहे. गृहमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष देऊन याची चौकशी करावी अशी मागणी आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेली आहे.
संजय राऊतांनी केली चिंता व्यक्त : आमदार प्रज्ञा सातव आणि आमदार शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता अजित दादा पवार यांनी सुद्धा ही गंभीर बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन त्याचा मास्टर माईंड शोधावा अशी मागणी केलेली आहे.
आदित्य ठाकरे, डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे गृह विभागाला आदेश
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि महिला आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यांबाबत दखल घेऊन कठोर कारवाई करावी असे निर्देश डॉ. नीलम गोर्हे यांनी गृह विभागाच्या सचिवांना दिले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान 7 फेब्रुवारी रोजी बीडकीन परिसरात त्यांच्या सभास्थानी दगडफेक झाल्याची होती.
8 फेब्रुवारी रोजी सातव यांच्यावर हल्ला : काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची 8 फेब्रुवारी रोजी घडली आहे. या दोन्ही घटनांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याचसोबत या विषयावर दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत आज गृह विभागाला निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत. याबाबत त्यांनी आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांना निवेदन दिले आहे.
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा महिला आयोगाने केला निषेध
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा राज्य महिला आयोगाने जाहीर निषेध केला आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून हिंगोली पोलीस अधीक्षकांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दोषीवर कारवाई करण्याची मागणी :एक महिला लोकप्रतिनिधीवर होणारा हा भ्याड हल्ला हा खरंतर निषेधार्थ आहे. याची दखल सरकारने, गृह विभागाने तातडीने घेणे गरजेचे आहे. सरकारने तात्काळ दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे. राज्य महिला आयोग सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करत आहे.
महिलाच्या सुरेक्षेची काळजी कोण घेणार ? : 37% महिला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात. एका लोकप्रतिनिधीवर हल्ला होत असेल तर, विद्यार्थी गृहिणी यांच्या सुरक्षेतेची काळजी कोण घेणार? असा प्रश्न चारणकर यांनी उपस्थित केला आहे. महिलांवर हल्ले होणे खूपच चिंताजनक बाबा असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -PM Narendra Modi Rajya Sabha Speech : शरद पवारांचंही सरकार पाडलं! मोदींनी वाचला काँग्रेसचा इतिहास