महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची मागणी, पासलकरांनी घेतली वडेट्टीवारांची भेट - Minister Vijay Vadettiwar Latest News

दौंड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिष्टमंडळासह पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळ पासलकर यांनी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नावर वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली.

Pune District Latest News
पासलकरांनी घेतली वडेट्टीवारांची भेट

By

Published : Dec 26, 2020, 7:22 PM IST

दौंड - दौंड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिष्टमंडळासह पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळ पासलकर यांनी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नावर वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली.

पुर्नवसीत गावांचे प्रश्न सोडवण्याची मागणी

पानशेत धरण व वरसगाव धरण प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या शासन निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यांना तातडीने जमीन वाटप करण्यात यावी. पुर्नवसीत गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करावा अशा विविध मागण्या यावेळी वडेट्टीवार यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी शिवसेना युवा सेना प्रमुख समीर भोईटे, उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, शाखा प्रमुख दिपक भंडलकर यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details