महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Corona Update : पुण्यात एन95 मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत 50 ते 75 टक्क्यांनी वाढ

पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या ( Pune Corona Patients Increases ) पाहता शहरात गेल्या काही दिवसांपासून एन95 आणि सॅनिटायझरच्या मागणीत 50 ते 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ( Mask and Sanitizer Demand Increases Pune ) पुणे शहरातील सदाशिव पेठेतील होलसेल मार्केटमध्ये दरोरोज मोठ्या संख्येने नागरिक आणि छोटे मोठे दुकानदार हे मास्क आणि सॅनिटायझरच्या खरेदीसाठी गर्दी करत आहे.

Demand for N95 masks and sanitizers increases by 50 to 75 percent in Pune
पुण्यात एन95 मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत वाढ

By

Published : Jan 10, 2022, 8:29 PM IST

Updated : Jan 10, 2022, 10:47 PM IST

पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ( Pune Corona Patients Increases ) कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरात मास्क आणि सॅनिटायझरची विक्री ही मंदावली होती. मात्र, आत्ता गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ( Mask and Sanitizer Demand Increases Pune ) यामुळे शहरात 1 जानेवारीपासून N95 आणि सॅनिटायझरच्या मागणीत 50 ते 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

तब्बल 50 ते 75 टक्के वाढ -

राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ आहे.ओमायक्रॉनचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाच्यावतीने नागरिकांना एन95 आणि थ्री लेअर मास्क वापरण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात गेल्या काही दिवसांपासून एन95 आणि सॅनिटायझरच्या मागणीत 50 ते 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील होलसेल मार्केटमध्ये दरोरोज मोठ्या संख्येने नागरिक आणि छोटे मोठे दुकानदार हे मास्क आणि सॅनिटायझरच्या खरेदीसाठी गर्दी करत आहे.

हेही वाचा -Dagdusheth Temple Administration Appeal : जास्तीत जास्त ऑनलाईन दर्शन घ्या; दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाचं आवाहन

एन 95 मास्कला जास्त मागणी -

कोरोनापासून संरक्षणासाठी शासनाच्यावतीने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. कोरोनाकाळात मास्क आणि सॅनिटायझरचे महत्त्व हे सर्वसामान्य नागरिकांना कळाले आहे. आत्ता सर्वजण दररोजच्या जीवनात या दोन वस्तूंचा कटाक्षाने वापर करताना दिसतात. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर मास्क आणि सॅनिटायझरची विक्री मोठ्या प्रमाणात कमी होत होती. मात्र, ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग आणि या विषाणूची वाढती तीव्रता पाहता नागरिक आत्ता एन95 आणि सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले आहेत. म्हणून शहरात मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत तब्बल 50 ते 75 टक्के एवढी वाढ झाली आहे.

Last Updated : Jan 10, 2022, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details