पुणे - राज्यात लवकरच दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात येणार ( Ministry of Disabled Persons will be established ) असून त्याबाबत सरकारने घोषणाही केली आहे. यावर प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू ( MLA Bachu Kadu ) यांना आपण या मंत्रालयाचे मंत्री होणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी तसे झाल्यास आनंद त्यासारखा आनंद नाही. दिव्यांगाचा एक कार्यकर्ता आंदोलन करता करता मंत्रीपदावर जाईल. तसेच पहिले मंत्रिपद मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होईल, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
दिव्यांग मंत्रालयाचे पहिले मंत्रीपद दिल्यास आनंद - बच्चू कडू स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी संवाद -पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरहम फाउंडेशन, वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यामाने "स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, बच्चू कडू आदी उपस्थित होते.
प्रश्नपत्रिका दोषमुक्त असावी - MPSC विद्यार्थ्याची दोषमुक्त प्रश्नपत्रिका असावी. ही या मुलांची अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. परीक्षेला उशीर होता कामा नये तसेच परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी मुलांची मागणी आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत असे कडू म्हणाले.
राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध - दिव्यांग मंत्रालयाबाबत मंत्रिमंडळाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. दिव्यांगांच्या प्रश्नाच्या तुलनेत ही फार छोटी गोष्ट आहे. जे काही वंचित आहे ते त्यांना न्याय मिळाला पाहिजे. संजय राऊत यांनी आज जे वक्तव्य केल आहे त्याबाबत कडू यांना विचारलं असता ते म्हणाले की संजय राऊत यांचं म्हणणं काही प्रमाणात योग्य असते. महापुरुषांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे बोलणे योग्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सगळ्याच गोष्टीत कारवाईची शक्यता नसते. ज्याला त्याला समजलं पाहिजे. स्वतःला जनाची नाही तर मनाची असली पाहिजे.
ठाकरेंवर टीका -राज्यात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर एकत्र येणार, असे कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, या शक्ती एकत्र आल्या तरी तुम्ही लोकशक्तीसाठी काय केले? दिव्यांगांसाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदाही ही भेट झाली नाही. लोकांचे हित नसेल तर, अशा शक्ती एकत्र आल्यास काय होणार अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.