पुणे -औंध परिसरातून पती-पत्नीच्या भांडणाचा एक वेगळाच प्रकार समोर आला. मटण बनविण्यासाठी उशीर लागणार असल्याचे पत्नीने सांगताच मद्यपी पतीने तोंडावर ठोसा मारून तिथे तिचे दात पाडले. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. त्यानंतर पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून प्रभाकरन नाडार (वय-45) याच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडर दाम्पत्य औंध गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी प्रभाकरन नाटक दारू पिऊन घरी आला. सोबत येताना त्याने मटण आणले होते. त्यांनी पत्नीला हे मटण बनवून देण्यासाठी सांगितले. मात्र, पत्नीने आता मी कामात आहे. मटन बनवण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे सांगितले.