देहू (पुणे) - कोरोनाच्या वाढत्या परिणामामुळे देहू नगरीतील संत तुकाराम महाराज यांचे मंदिर भाविकांसाठी आजपासून (मंगळवार) २३ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त विशाल मोरे यांनी दिली आहे. कोरोनामुळे अनेक महत्वाची मंदिर बंद करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 9 जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे मोरे म्हणाले.
देहूतील संत तुकाराम मंदिर २३ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद; विश्वस्तांचा निर्णय - dehu sant tukaram tempal
कोरोनामुळे देहू नगरीतील संत तुकाराम महाराज यांचे मंदिर भाविकांसाठी आजपासून (मंगळवार) २३ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त विशाल मोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा -Coronavirus : भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात 39 जण आढळले
पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे शहरात राज्यातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. दोन्ही शहरात मिळून एकूण १६ जणांना लागण झालेली आहे. त्यामुळे विविध स्तरावर स्थानिक पातळीवर विशेष उपाय योजना केल्या जात आहेत. देहू नगरीतील तुकोबांचे मंदिर आजपासून २३ मार्च पर्यंत बंद असणार आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता, पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले आहे. मात्र, मंदिरामध्ये नित्याची पूजा होणार आहे.