महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dehu Sansthan on Ketki Chitle - केतकीच्या 'त्या' पोष्टवर देहू संस्थानने घेतला आक्षेप; गुन्हा दाखल करण्याची मागणी - पुणे संत तुकाराम महाराज देहू संस्थान बातमी

श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं तुकोबाच नव्हे तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर करू नये. असे लेखन करत असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे देहूसंस्थांनने म्हटले आहे.

dehu sansthan demands to file a case against ketki chitale for misusing the name of saint tukaram in pimpri chinchwad
केतकीच्या 'त्या' पोष्टवर देहू संस्थानने घेतला आक्षेप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

By

Published : May 15, 2022, 4:46 PM IST

Updated : May 15, 2022, 5:05 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) -केतकी चितळेच्या आक्षेपार्ह लिखाणाच्या पोष्टवर देहू संस्थानने नाराजी व्यक्त केली असून तुका म्हणे शब्दांवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी देहू संस्थानने देहूरोड पोलिसात पत्र दिले असून केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय.

केतकीच्या 'त्या' पोष्टवर देहू संस्थानने घेतला आक्षेप; गुन्हा दाखल करण्याची मागणी
अभंगाची स्वाक्षरी - जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे शब्दांचा वापर करून वादग्रस्त लिखाण (पोष्ट) केलेल्या केतकी चितळेवर गुुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र देहू संस्थाने पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलं आहे. केतकीने तुका म्हणे शब्दांचा वापर करून विटंबना, वादग्रस्त लिखाण केले. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं तुकोबाच नव्हे तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर करू नये. असे लेखन करत असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे देहूसंस्थांनने म्हटले आहे.
Last Updated : May 15, 2022, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details