पुणे - रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. प्रसन्ना उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार आणि हितेश उर्फ नाना सुनील काळे असे अटक करण्यात आलेला आरोपींची नावे असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.
रावण टोळीतील दोन गुन्हेगारांना अटक हेही वाचा - सावधान! फेसबुकवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
दोघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी किशोर परदेशी यांना माहिती मिळाली की, रावण टोळीतील एक सदस्य प्रसन्ना उर्फ सोन्या हा गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस बाळगून आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आली संबंधित ठिकाणी सापळा रचून प्रसन्ना उर्फ सोन्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस मिळाले आहे. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात या आहे.
दुसरा रावण टोळीचा सदस्य हितेश उर्फ नाना सुनील काळे हा किन्हई गावच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी जाऊन सराईत गुन्हेगार हितेशला अटक करण्यात आली. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असल्याच समोर आले. दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, किरण कणसे, गणेश गायकवाड, पोलीस कर्मचारी सुभाष सावंत, सात्रस, प्रमोद उगले, राजू कुरणे, अनिल जगताप, किशोर परदेशी, सचिन शेजाळ, विक्की खोमणे, नारायण तेलंग, हेमंत गायकवाड यांनी केली आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत गावठी कट्ट्यासह एकाला अटक