महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासांठी शासनाच्या नियमानुसार दर आकारावे' - pune corona update

पुणे आणि पिपंरी चिंवडमधील मधील खासगी रुग्णालय प्रमुखांसोबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी करावी, असे सांगितले. या बैठकीला पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी योग्य नियोजन करावे,असेही म्हैसेकर यांनी सांगितले.

commissioner meeting wih private hospital owners
विभागीय आयुक्तांची खासगी रुग्णालय प्रमुखांसोबत बैठक

By

Published : Jun 1, 2020, 5:48 PM IST

पुणे-कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या आहेत. खासगी रुग्णालय व्यवस्थापनाने प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने पुणे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी कॉन्सिल हॉल मध्ये पुणे, पिंपरी चिंचवड मधील खासगी रुग्णालय प्रमुख आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, भारती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अस्मिता जगताप यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड मधील खासगी रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, व डॉक्टर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशात निश्चित करून दिल्यानुसार दर आकारणी करावी. खासगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा चोखपणे बजवावी, तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृती करावी. रुग्णालयांच्या अडचणी निश्चितच दूर केल्या जातील, असे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरात व जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे, असे डॉ. म्हैसेकर म्हणाले. रुग्णालयाने शासनाकडे अद्ययावत व वस्तूस्थितीदर्शक माहिती सादर करावी, जेणेकरून व्यवस्थापन करणे सुलभ होईल. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असून ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण सर्व मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वासही डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला. कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व अन्य वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोव्हिड केअर सॉप्टवेअरची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण, उपचार करण्यात आलेले रुग्ण, हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा, रुग्णवाहिका व्यवस्था, अधिक रुग्ण असलेली क्षेत्रे, रुग्णांचे समुपदेशन, मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना, डॉक्टरांना आवश्यक सोयी-सुविधा, पीपीई किट, सॅनिटायझर आदी वैद्यकीय साधनसामग्रीची उपलब्धता, उपलब्ध आणि आवश्यक डॉक्टर व परिचारकांची संख्या अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details