पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी 9 आमदारांना सोबत घेऊन भाजप आणि शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत भूकंप केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी उपमहापौर, दीपक मानकर यांनीसुद्धा अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.
शरद पवार यांनी पुन्हा एकदा विचार करावा : 83 व्या वर्षी जर शरद पवार हे तरुण म्हणून फिरत असतील तर, मग राजकीय महत्वकांक्षा असणे वाईट आहे का? त्यामुळे मुख्यमंत्री व्हायला मग 82 व्या वर्षीची अजित पवार यांनी वाट बघायची का? आम्ही अजित पवार यांचे समर्थन करत आहे. आजित पवार यांना शरद पवार यांनी संधी दिली पाहिजे. तसेच शरद पवार यांनी सुद्धा आशीर्वाद द्यावेत. पुणे शहरातले असंख्य नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा विचार करावा अशी सर्वांची भूमिका असल्याचे दीपक मानकर यांनी म्हटले आहे.