महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी - survey about suicidal cases news

गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्या कमी झाल्याचे एका सर्वेक्षणातील आकडेवारीतून समोर आले आहे. टाळेबंदीत नैराश्य, आर्थिक चणचण, कौटुंबीक वादातून आत्महत्यांच्या घटना वाढीस लागल्याचे सांगितले जात असताना पुण्याचा अहवाल दिलासा देणारा ठरला आहे. जवळपास १३ टक्क्यांनी आत्महत्या कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्यांचे प्रमाण कमी
गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्यांचे प्रमाण कमी

By

Published : Aug 19, 2020, 4:55 PM IST

पुणे - आत्महत्या, म्हटल तरी अंगावर काटा येत येतो. मात्र, कुठल्या ना कुठल्या कारणावरून अनेकजण आत्महत्या करतात. पण पुण्यात करण्यात आलेल्या सर्व्हेत गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्यांचा आलेख कमी झाला आहे. मात्र, आत्महत्या कमी होणे स्वाभाविक असलं तरी त्यामागची कारणं धडा शिकवणारी आहेत. या सर्वेक्षणातून आत्महत्या कोणत्या कारणांमुळे कमी झाल्या. आत्महत्या कमी होण्यास कसला आधार होता, याबाबत माहिती घेण्यात आली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्यांचे प्रमाण कमी

पुण्यातील एसएनडिटी महाविद्यालय आणि पुणे पोलीस प्रशासन यांनी एकत्रित केलेल्या अभ्यासात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यात दिलासादायक बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत टाळेबंदीत आत्महत्या कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. टाळेबंदीत नैराश्य, आर्थिक चणचण, कौटुंबीक वादातून आत्महत्यांच्या घटना वाढीस लागल्याचे सांगितले जात असताना पुण्याचा अहवाल दिलासा देणारा ठरला आहे. जवळपास १३ टक्क्यांनी आत्महत्या कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. टाळेबंदीत अनेकजण सहकुटुंब घरी होते. तसेच कुटुंबांनी दिलेल्या आधारामुळे अनेकांनी नैराश्यावर मात केल्याचा महत्वाचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

गेल्यावर्षी मार्च ते जुलै २०१९ या कालावधीत शहरात ३०५ आत्महत्या घटनांची नोंद झाली होती. तर, २०२० च्या मार्च ते जुलै या टाळेबंदीच्या काळात २६४ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. दरम्यान महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी याचा सखोल अभ्यास केल्यानंतर अहवालातून धडा घेता येणार असल्याचे म्हटले आहे. टाळेबंदीत लोकांना घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे प्रेमप्रकरण, रेल्वे रुळाकडे जाणे, पुलासह नदीवर किंवा विहिरीकडे धाव घेता आली नाही. यात आणखी एक बाब म्हणजे घरात जीवन संपविण्याऐवजी संवाद वाढल्याने जीवनाचे महत्व लक्षात आले असावे असाही एक तर्क काढला गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details