पुणे :पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे ( MNS leader Vasant More from Pune ) यांच्या नाराजीनंतर, त्यांनी जाहीर अजितदादा पवार ( Ajitdada Pawar ) यांनी मला ऑफर दिल्याचे सांगितल्यानंतर पुण्यातील मनसेच्या वतीने शहर कमिटीचे आज बैठक आयोजित करण्यात आली होती.
मनसे काय भूमिका घेणार ? या बैठकीमध्ये वसंत मोरे यांच्या संदर्भात जो काही निर्णय आहे तो त्या दोन दिवसात देणार असल्याचे मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितलेला आहे. वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करताना बाबू वागस्कर यांचे सुद्धा नाव घेतलं होतं. त्यांच्यामुळे पक्षाचे हानी होत असल्याचे म्हटलं होतं त्यामुळे या वसंत मोरे यांच्या नाराजीवर मनसे काय भूमिका घेणार याची सर्वत्र चर्चा होती.
पुण्यात मनसे कोअर कमिटीची बैठक -आज मनसेची पुण्यात बैठका आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पुण्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते त्याच्या दोन दिवसात आम्ही सविस्तर याची माहिती देऊ असेही मनसे नेते बाबू वागस्कर यांनी यावेळी बोलताना म्हटला आहे. वसंत मोरेंच्या नाराजीनंतर पुण्यात मनसे कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली आहे वसंत मोरे यांच्याबाबत येत्या 2 दिवसांत सविस्तर खुलासा करू अशी महिती मनसे नेते बाबू वागस्कर दिली आहे.
वसंत मोरेंची जाहीर नाराजी - वागस्कर यांच्यावर वसंत मोरेंची जाहीर नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक कार्यकर्त्याला कोणी ना कोणी विचारतच असत. त्यामुळे मोरेंनाही विचारलं असेल आज दोन मिटिंग झाल्या. कोअर कमिटी आणि शहर कार्यकारणी येत्या काळात काय आंदोलन करायचे यावर चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मला संपवण्याच्या दृष्टीने काम -मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे एका लग्न समारंभात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार देण्याची ऑफर दिली आहे. नुकतेच मनसेच्या शहर, मनसेच्या वतीने येरवडा मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना भाषण करू दिले नाही. त्यामुळे वसंत मोरे नाराज आहेत. शहरातील काही पदाधिकारी मला संपवण्याच्या दृष्टीने काम करत असून .त्यासाठीच ते मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे.