पुणे : दख्खनची राणी अशी ओळख असलेल्या डेक्कन क्वीन या रेल्वे गाडीला सुरू होऊन आज 94 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात, केक कापत दख्खनच्या राणीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी हे उपस्थित होते.
मुंबई पुण्याला जोडते डेक्कन क्वीन :महाराष्ट्राची सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला रेल्वे मार्गाने डेक्कन क्वीन ही गाडी जोडते. त्यामुळे प्रवाशांच्या या लाडक्या राणीने आज 94 वर्षात पदार्पण केले आहे. दोन्ही शहरातील हजारो प्रवासी या डेक्कन क्वीनने प्रवास करतात. गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शाह यांच्यावतीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला जातो. यावेळी देखील हा कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
दख्खनची राणी झाली 94 वर्षाची पुणे मुंबई मार्गावर डेक्कन क्वीन :ग्रेट इंडियन पेनिनसुला या रेल्वे कंपनीने पहिली लक्झरीयस ट्रेन सेवा म्हणून 1 जून 1930 रोजी पुणे मुंबई मार्गावर डेक्कन क्वीन एक्सप्रेस सुरू केली होती. आज त्याला 94 वर्षेपूर्ण झाले आहे. पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी, महाराजा एक्स्प्रेस, यासारख्या महागड्या गाड्यांमध्ये असलेल्या डायनिंग कारचा डेक्कन क्वीनमध्ये समावेश आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनला इतर गाड्यांपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दख्खनची राणी झाली 94 वर्षाची भारतातील पहिली अति जलद गाडी :डेक्कन क्वीन ही भारतातील पहिली अति जलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटिश लोकच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे १९४३ मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी भारतीयांना देण्यात आली. तेव्हापासून या गाडीकडे प्रवाशांचा जो ओघ सुरू झाला तो आजही कायम आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन गेली 94 वर्षं खंडाळ्याच्या घाटातून मुंबई ते पुणे धावत आहे.
आज आमच्या राणीचा वाढदिवस :आज आम्ही मुंबई या ठिकाणी काम करत असून गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वेमधून आम्ही दरोरोज प्रवास करत असतो. आमचे एक वेगळे नाते या गाडीशी असून आज तिचा वाढदिवस असल्याने आम्हाला आमच्याच घरच्यांचा वाढदिवस असल्याचे जाणवत आहे. आज आमच्या राणीचा वाढदिवस असल्याने आम्हाला खूप आनंद होत असल्याच्या भावना यावेळी काही प्रवश्यांनी व्यक्त केल्या.
डेक्कन क्वीनचे अनेक रेकॉर्ड :यावेळी रेल्वे ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शाह म्हणाल्या की अनेक रेकॉर्ड केलेल्या या डेक्कन क्वीनचा वाढदिवस गेल्या अनेक वर्षापासून आम्ही साजरा करत आहोत. दररोज दोन हजार हून अधिक प्रवासी यामधून प्रवास करतात. या डेक्कन क्वीनशी आमचे नाते हे रक्ताच्या पलीकडे झाले आहे. तिने जी आम्हाला सर्व्हिस दिली आहे. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी 69 वर्षापासून वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -
- Summer Special Trains: आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेच्या ५ विशेष गाड्या; 'या' तारखेपासून करा बुकिंग
- AC Local Trains : मुंबईत एसी लोकलला भरभरून प्रतिसाद, रेल्वेला 32 कोटींचा महसूल