महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटनेचा प्रयत्नांना यश; 'डेक्कन क्वीन' सुरू - रेल्वे बातमी

पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू झाली आहे. ही रेल्वे कोरोनामुळे 14 मे रोजी बंद करण्यात आली होती.

रेल्वे
रेल्वे

By

Published : Jun 24, 2021, 2:01 AM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 14 मे रोजी बंद झालेली पुणे-मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे सेवा सुरू करण्याची मगाणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेने केली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संघटनेने रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांचा तसेच राजकीय पक्षांचा आमदार, खासदार यांच्या भेटी घेतल्या, अशी माहिती पिंपरी-चिंचवड रेल्वे संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, रेल्वे बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व सामान्य प्रवाशांचे किती हाल होत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या सर्व बाबी संघटनेने लक्षात आणून दिले होते. अखेर संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासकीय कार्यालयीन वेळ वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या रेल्वेची संध्याकाळची वेळ 6.30 वाजता करण्यात यावी तसेच सर्व सामान्य प्रवाशांचा विचार करुन सकाळी कर्जत-कल्याण-ठाणे येथे कार्यालयात वेळेवर पोहचता यावे म्हणून सकाळची सिंहगड एक्सप्रेस सुरू करण्याची मागणीही रेल्वे प्रवासी संघटना करत आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिली आहे.

हेही वाचा -बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना काळातल्या कामाची नोंद इतिहासात होईल - उपमुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details