पुणे - राजगुरुनगरजवळ भीमानदी पात्रातील बंधाऱ्यात एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र, या महिलेची आत्महत्या आहे, की हत्या हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
पुण्यात भीमानदीपात्रात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह - राजगुरुनगर
खरपुडी गावातील नागरिकांना रविवारी सकाळच्या सुमारास भीमानदीवरील बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
नदीपात्रातून बाहेर काढलेला मृतदेह
खरपुडी गावातील नागरिकांना रविवारी सकाळच्या सुमारास भीमानदीवरील बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर स्थानिकांनी संबंधित घटनेची माहिती राजगुरुनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह बाहेर काढला. यासंदर्भातील अधिक तपास राजगुरुनगर पोलीस करत आहेत.