पुणे - जिल्ह्याच्या रांजणगाव चाकण औद्योगिक वसाहतीत आता कोरोचा शिरकाव झाला असून, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कामगाराचा कोरोमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नामवंत कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला कोरोनाची लागण झाली होती.
रांजणगाव एमआयडीसीतील मृत्यू झालेल्या कामगाराला कोरोनाची लागण!
रांजणगाव वसाहतीतील या कामगराच्या थेट संपर्कातील 50 कामगारांना आता क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी येथील एका प्रसिद्ध आणि बड्या कंपनीतील कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाबाधित कामगार पुण्यातील हडपसर भागातून कामासाठी येत होता. दरम्यानच्या काळात या कामगाराचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूनंतर या कामगाराचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. अखेर या कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, कोरोनामुळे या कामगाराचा मृत्यू झाल्याने रांजणगाव औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रांजणगाव वसाहतीतील या कामगराच्या थेट संपर्कातील 50 कामगारांना आता क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी येथील एका प्रसिद्ध आणि बड्या कंपनीतील कामगाराला कोरोनाची लागण झाली असून, या कामगारावरती पिंपरी चिंचवड येथे एका रूग्नालयात उपचार सुरू आहेत. हा कामगार पिंपरी चिंचवड परिसरातील काळेवाडी येथून चाकण औद्योगिक वसाहतीत कामाला येत होता.