महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात संशयास्पद अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह - Sinhagad Police Tejasa payal News

आठवड्यापूर्वी तेजसा आपल्या आई आणि बहिणीसह बीडला गेली होती. मात्र, काही कामानिमित्त तेजसा तीन दिवसांपूर्वी एकटीच पुण्यात परतली. सोमवारी सकाळी तिचा राहत्या घरी मृतदेह आढळला.

pune
तेजसा पायाळ

By

Published : Dec 3, 2019, 11:49 AM IST

पुणे- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजसा शामराव पायाळ (वय.२६) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तेजसा ही मूळची बीड जिल्ह्यातील निवासी आहे. ‘एमबीए’ पर्यंत तिचे शिक्षण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ती नोकरीसाठी पुण्यात आली होती. ती माणिकबागेतील एका सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेऊन आपल्या आई व बहिणीसह राहत होती. आठवड्यापूर्वी तेजसा आपल्या आई आणि बहिणीसह बीडला गेली होती. मात्र, काही कामानिमित्त तेजसा तीन दिवसापूर्वी एकटीच पुण्यात परतली. सोमवारी सकाळी तिचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला. दरम्यान, ज्या घराच्या खोलीत तेजसाचा मृतदेह आढळला होता, त्या खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडले होते. खोलीत दारूच्या रिकाम्या बाटल्याही आढळल्या आहेत. सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा-इथिओपियाचा सोलोमन 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता

ABOUT THE AUTHOR

...view details