पुणे:मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही. कदाचित हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून आला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. कारण मृतदेह जेथे आढळला त्या परिसरात मृतदेहाचे कोणतेही कपडे अथवा कोणतीही वस्तू आढळलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या एनडीए परिसरात असणाऱ्या कुडजे गावच्या नागरिकांनी खडकवासला धरणाच्या पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे पाहिले होते.
बोटीची मदत: मृतदेह पाहल्यानंतर त्यांना वेगळा संशय आला. त्यांनी पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना याबाबत माहिती दिली. जवानांनी नौदनाच्या बोटीच्या सहायाने हा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याची माहिती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी खडकवासला धरण परिसरातील आजूबाजूच्या गावात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या ताब्यात दिले:गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उत्तम नगर पोलीस चौकीतून कॉल आला की, कमळादेवी मंदिराजवळ NDA नावालगेटच्या आतमध्ये खडकवासला धरणाच्या किनाऱ्यालगत एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षाला दिली. घटनास्थळाची माहिती मिळताच विभागीय अग्निशामक अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी अग्निशमन केंद्रातून रवाना झाले. तर चालक अतूल रोकडे फायरमन किशोर काळभोर , विशाल घोडे, श्रीकांत आढाऊ, सूरज इंगवले हे कर्मचारी वाहनासोबत रवाना झाले. वाहन पोहोचल्यानंतर व्यक्तीस पाण्यातून बाहेर काढून उत्तम नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुलीचा मृतदेह सापडला:या आधीही अशीच एक घटना सातारा येथे घडली होती. साताऱ्यातील कण्हेर धरणाच्या जलाशयात तरूणासह एका तरूणीचा मृतदेह आढळा होता. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ माजली होती. तर आत्महत्या करणारे प्रेमी युगल असावेत, असा संशय व्यक्त केला होता. कण्हेर धरणातील पाण्यावर मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला होता, तर मुलाचा मोबाईल आणि गॉगल धरणाशेजारी सापडला. त्यानंतर शोधाशोध केल्यावर मुलाचाही मृतदेह सापडला. यावरूनच प्रेमी युगल असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
हेही वाचा: Pune Accident बेल्हा जेजरी मार्गावर भीषण अपघात माय लेकांसह मित्राचाही जागीच मृत्यू