पुणे -वारजे माळवाडी येथील पुलाखाली एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहाचे अजूनपर्यंत ओळख पटलेली नाही.
हेही वाचा - किरकोळ कारणावरुन केडगावात दोन गटात बाचाबाची
वारजेतील स्मशानभूमीजवळील पुलाखाली काही लोक गेली असता, त्यांना तेथे उग्र वास येऊ लागला. त्यांनी याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळताच वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता, त्यात एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
अग्निशामक व पोलिसांनी मृतदेह बागेतून बाहेर काढून शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. मृताची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम म्हणाले, मृतदेह 32 ते 35 वयोगटातील आहे. खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बॅगेत घालून पुलावरून टाकला असण्याची शक्यता आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.
हेही वाचा - नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र पुन्हा सुरू; कारंजातील 'पीएनबी'चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न