महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड; अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त - daund crime news

पप्पू उर्फ शंभू सतीश कवडे हा दौंड तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात बेकायदेशीपणे वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली असता त्याच्या जवळ एक फायबर आणि एक शेक्शन बोट असे एकूण 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला .

दौंड; अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
दौंड; अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Feb 1, 2021, 8:47 AM IST

Updated : Feb 1, 2021, 9:49 AM IST

पुणे- (दौंड) दौंड तालुक्यातील मलठण येथे अवैध रीतीने सुरू असलेल्या वाळु उपशावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी फायबर बोट आणि सेक्शन बोट जिलेटीनच्या साह्याने उडवून देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड; अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई

जिलेटीनच्या साह्याने बोटी उडवल्या-

पप्पू उर्फ शंभू सतीश कवडे हा दौंड तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात बेकायदेशीपणे वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली असता त्याच्या जवळ एक फायबर आणि एक शेक्शन बोट असे एकूण 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला .
दौऺड पोलीस स्टेशन बोटी पोलीस स्टेशनला वाहून आणणे शक्य नसल्याने महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिलेटिनच्या साह्याने स्फोट घडवून बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत .

एकावर गुन्हा दाखल
अवैध वाळू उपसाबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे पप्पू उर्फ शंभू सतीश कवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 1, 2021, 9:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details