दौंड(पुणे)- कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईत विना मास्क फिरणाऱ्या ७२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.
विनामास्क फिरणाऱ्या ७२ जणांवर दंडात्मक कारवाई; तर ६ जणांवर गुन्हा दाखल - दौंड विनामास्क कारवाई बातमी
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार नागरीकांना मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
कारवाईला सुरुवात
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार नागरीकांना मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे, असे आव्हान वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरीही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा विनामास्क फिरणाऱ्यांवर यवत पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगरला आहे.
एकूण इतका दंड वसूल
काही दिवसांपूर्वी पाटस पोलीसांनी पाटस आणि वरवंड परिसरात विना मास्क फिरणाऱ्या ७४ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाईत २४ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला होता. यानंतर पुन्हा यवत पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या ७२ जणांवर कारवाई करत १६ हजार ८०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
तर दंडात्मक कारवाई केली जाईल
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनामास्क फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केल्या जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी दुकानात सॅनिटायझर ठेवले नाही, विनामास्क आढळल्यास संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करणार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा-कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश