पुणे -दौंड शहरालगत असणाऱ्या वेताळ नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस नरिक्षक सुनील महाडिक यांनी दिली. राजू गलास्या काळे (वय.५५, रा. वेताळनगर, दौंड जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात महिलांची छेडछाड, धमकी देणे, सावकारी करणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल आहेत.
दौंड शहरातील राजू काळेवर तडीपारची कारवाई, यापूर्वीही गुन्हे दाखल
हा व्यक्ती समाजसेवेचा बुरखा पांघरून प्रशासनास अडचण निर्माण करतो. या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी मोक्का मधील आरोपी सोडवण्यासाठी या व्यक्तीने पोलीस स्थानकासमोर आंदोलन केले होते. काळे हा सावकारीचा धंदा करत असताना लोकांच्यावर अन्याय करत असतो. याबाबत कोणी कायदेशीर तक्रार देण्यासाठी आले तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ही व्यक्ती देते. पोलीस स्थानकात अर्ज देऊन लोकांना ब्लॅकमेल करणे व तडजोड झाल्यानंतर अर्ज मागे घेणे या प्रकारचे गुन्हे वारंवार करत आहे.

काळेवर निवडणूक काळात अनेक वेळा प्रतिबंधक कारवाई केली आहे. मात्र, या प्रतिबंधक कारवाई नंतर सुद्धा तो सुधारला नसल्याने त्याच्याविरोधात दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार या प्रस्तावावर सुनावणी होऊन राजू काळे याला दोन वर्षाकरता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या आदेशानुसार दि.19 ला त्याला जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले आहे. यापुढील काळात राजू काळे हा पुणे जिल्ह्यात आढळून आल्यास दौंड पोलीस ठाण्याशी आथवा पुणे ग्रामीणच्या कोणत्याही पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.