महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Daughters Beat Father : आईसह दोन लेकीने केली वडिलांना बेदम मारहाण, डोके फुटल्यानंतर गुन्हा दाखल

पुण्यात क्षुल्लक कारणावरून मुलींनी आईच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण ( Daughters beat fathers refusing eat ice cream ) केली. वडिलांनी आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग मनात धरत नुलांनी वडिलांचे डोके भिंतीवर आदळले. यात त्यांच्या मेंदूला जबर मार बसला.

By

Published : Dec 9, 2022, 12:27 PM IST

Updated : Dec 10, 2022, 2:22 PM IST

Daughters Beat Father
मुलींची आईच्या मदतीने वडिलांना जबर मारहाण

पुणे :पुण्यात सध्या काय होईल काय होणार नाही, याबाबत कोणीही काय सांगू शकत नाही. पुण्यातील वडगांव शेरी परिसरात एक धक्कादायक घटना केली आहे. वडिलांनी आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग आल्याने मुलींनी आईच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली ( Daughters beat fathers refusing eat ice cream ) आहे. आई आणि मुलींनी मारहाण करत वडिलांचे डोके भिंतीवर आदळले ( Wife beat husband with daughters ) आहे.


आई आणि मुलींची मारहाण : हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी भागात घडला ( Father beaten refusing eat ice cream ) आहे. याप्रकरणी सतीन जाधव (५१) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. शामला जाधव (५३), स्नेहल अमोलिक (३८) आणि तेजस्वी अमोलिक (३४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेंदूला जबर मार :जाधव हे नेहमीप्रमाणे २ डिसेंबर रोजी घरी आले असता त्यांच्या मुलींना बाहेरून येताना आईस्क्रीम घेऊन आले होते. मी ४ चपात्या खाणारा माणूस आहे. या आईस्क्रीमने माझे पोट भरणार नाही असे जाधव यांनी सांगितले आणि आईस्क्रीम फेकून दिले. याचा राग त्या दोन्ही मुलींना ( Daughters beat fathers in Pune ) आला. या दोन्ही मुलींनी त्यांच्या आईची मदत घेत वडिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भिंतीवर जोरात आदळले. भिंतीवर डोके आदळल्यामुळे जाधव यांच्या मेंदूला जबर मार बसला असून ते गंभीर ( injuries in brains banging head on wall ) जखमी झाले.

तिघींवर पोलीस ठाण्यात गुन्हा :या प्रकरणी वडील जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून या तिघींवर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३२३, ३३७, ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

Last Updated : Dec 10, 2022, 2:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details