महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलीचा खून करून पसार झालेल्या बापाला तीन तासात बेड्या, दारूच्या वादातून झालं होतं भांडण - Daughter Murder Case

Daughter Murder Case : मुलीचा खून करून पसार झालेल्या नराधम बापाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकानं अवघ्या तीन तासात बेड्या घातल्या आहेत. आरोपी बाप दारू पितो. (Pune Wagholi area) काही काम करत नाही, यावरून मुलीसोबत आरोपीचं भांडण झालं होतं. याच रागातून आरोपीनं पोटच्या मुलीची हत्या केली. (murder due to dispute)

Daughter Murder Case
खुनीस अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 7:21 PM IST

खुनाच्या घटनेविषयी माहिती देताना डीसीपी बोराटे

वाघोली (पुणे)Daughter Murder Case :अक्षदा फकीरा दुपारगुडे (वय 15 वर्षे) असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे. ती इयत्ता 10 मध्ये शिकत होती. पोलिसांनी फकीरा गुंडा दुपारगुडे (वय 45, रा. नगर रोड जवळ, वाघोली) याला अटक केली आहे. (father arrested) याप्रकरणी मुलीच्या काकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलाने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्घृणपणे संपवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारगुडे हे सध्या वाघोली येथे वास्तव्यास असून ते मूळचे सोलापूर येथील आहेत.


पाठलाग करून घेतले ताब्यात :बापाच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी ससून येथे नेलं जात होतं; पण तिचा मृत्यू झाला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर युनिट सहाचे पोलीस पथक तपास करत असताना आरोपी फकीरा दुपारगुडे हा गाडीतळ, हडपसर येथे थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने हडपसर भागात पुणे-सोलापूर रोडवर आरोपीचा शोध घेतला. आरोपी घाई-गडबडीत बसमधून सोलापूरकडे जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतलं.


म्हणून केली हत्या :आरोपी केवळ दारू पितो. काही काम करत नाही म्हणून कुटुंबात सतत वाद होत होते. बुधवारी सकाळी पत्नी आणि मुलगा घरी नव्हते. यावेळी अक्षता आणि आरोपीमध्ये दारूच्या व्यसनावरून वाद झाले. याचा राग डोक्यात धरून आरोपीने अक्षतावर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. यावरून लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

'या' पोलिसांनी बजावले कर्तव्य :ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, प्रतीक लाहीगुडे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, ज्योती काळे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा:

  1. हिटलरच्या प्रचार यंत्रणेप्रमाणे भाजपाचं काम, शरद पवारांचा मोंदीवर हल्लाबोल
  2. रश्मी शुक्लांचं कमबॅक; अखेर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या रामभूमीतून फोडणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

ABOUT THE AUTHOR

...view details