मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी 'तो' बनला गाड्या चोर; भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी केले अटक
सौरभ दत्तात्रय चोरगे हा बारावीपर्यंत शिकला आहे. टाळेबंदीपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. पण, टाळेबंदी काळात त्याची नोकरी गेली. आरोपीच्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना दुचाकीवर घेऊन फिरण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली.
पुणे
पुणे- मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सौरभ दत्तात्रय चोरगे (वय २०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या तरुणाचा नाव आहे. टाळेबंदीमध्ये नोकरी गेल्यानंतर त्याने दुचाकी चोरण्याचा उद्योग चालू केला होता.
टाळेबंदीत नोकरी नाही म्हणून बनला चोर
सौरभ दत्तात्रय चोरगे हा बारावीपर्यंत शिकला आहे. टाळेबंदीपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. पण, टाळेबंदी काळात त्याची नोकरी गेली. आरोपीच्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना दुचाकीवर घेऊन फिरण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत मैत्रिणींसाठी पाच दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्याकडे आणखी तपास सुरू आहे.