माहिती देताना तृप्ती देसाई पुणे :तीन दिवसांपूर्वी एमपीएससी परिक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवार हिचा संशयास्पद मृतदेह हा सापडला होता. प्रेमाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दर्शना पवारच्या खुन्याला तीन महिन्याच्या आत फासावर लटकवा. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा आणि विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
अशी पटवली मृतदेहाची ओळख : याबाबत अधिक माहिती अशी की, 18 जून रोजी व्हिलेज पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावाच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या शेजारी ओपो कंपनीचा मोबाईल फोन, काळ्या रंगाचा गॉगल तसेच काळ्या रंगाची बॅग, तसेच निळ्या रंगाचे जरकिन अशा वस्तु सापडल्या होत्या. त्यावरून मृतदेहाची ओळख पटवली. ती 12 जून रोजी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास सिंहगड किल्ला फिरण्यास जाते असे सांगून निघून गेली होती. पण ती परत आली नव्हती. त्यामुळे तिचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे 15 जून रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.
दर्शना पवारच्या खुन्याला तीन महिन्याच्या आत फासावर लटकवा. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करावी - तृप्ती देसाई
प्रकरण फास्ट ट्रक कोर्टमध्ये चालला : याबाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाले की, दर्शना पवार हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले होते. अतिशय विश्वासू मित्राबरोबर ती गेली असताना, त्याने तिची हत्या केली आहे. अश्या आरोपीला ताबडतोब फाशी व्हायला हवी तसेच हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टमध्ये चालवले पाहिजे. अशी मागणी यावेळी तृप्ती देसाई यांनी केली.
राज्यात स्पर्धा परिक्षेत तिसरी :दर्शना दत्तू पवार मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. तिने स्पर्धा परीक्षेत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. दर्शना ही काही दिवसांपूर्वी अकादमी तर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. दर्शना आणि आरोपी राहुल यांची लहानपणापासूनची ओळख होती. राहुल दर्शनावर प्रेम करत होता. दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र प्रयत्नांमध्ये दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वनाधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले. त्याप्रमाणे लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूल नैराश्यात होता.
हेही वाचा -
- Darshana Pawar Murder : दर्शना पवार खून प्रकरण; प्रेमाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाची केली हत्या
- Darshana Pawar murder case: दर्शना पवार एमपीएससीतून अधिकारी झाली अन् मित्रानेच घात केला? आरोपीला मुंबईतून अटक