महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजीवन समाधी सोहळ्यासाठी दिंड्या आळंदीकडे रवाना, वारकऱ्यांचा धोकादायक प्रवास

आळेफाटा, नारायणगाव, कळम, मंचर, राजगुरुनगर, चाकण या शहरालगत पुणे-नाशिक महामार्गावरील घाटातून वारकरी दिंड्या जात आहेत. या ठिकाणी महामार्गावरील भरधाव वेगाने होणारी वाहतूक वारकऱ्यांसाठी धोकादायक आहे. नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेला हा पुणे नाशिक-महामार्ग आता वारकरी दिंड्या सुरू झाल्याने धोकादायक बनला आहे.

वारकऱ्यांचा धोकादयक प्रवास

By

Published : Nov 20, 2019, 12:26 PM IST

Updated : Nov 20, 2019, 2:24 PM IST

पुणे- आळंदी नगरीमध्ये बुधवारपासून संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरून मोठ्या संख्येने दिंड्या आळंदी नगरीकडे रवाना होत आहेत. 100 पेक्षा जास्त दिंड्या या मार्गावरून रवाना झाल्या आहेत. मात्र, या दिंड्या पुणे-नाशिक महामार्गावरून जीव धोक्यात घालून पायी प्रवास करत असल्याचे दिसत आहे.

वारकऱ्यांचा धोकादायक प्रवास

हेही वाचा - जेसीबीने मारले बैलाला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

आळेफाटा, नारायणगाव, कळम, मंचर, राजगुरुनगर, चाकण या शहरालगत पुणे-नाशिक महामार्गावरील घाटातून वारकरी दिंड्या जात आहेत. या ठिकाणी महामार्गावरील भरधाव वेगाने होणारी वाहतूक वारकऱ्यांसाठी धोकादायक आहे. नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेला हा पुणे नाशिक-महामार्ग आता वारकरी दिंड्या सुरू झाल्याने धोकादायक बनला आहे. वाढते शहरीकरण व वाहनांची वाढलेली संख्या यामुळे या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

हेही वाचा -बारामतीत ‘माणुसकीची भिंत’, 'नको असेल ते द्या, हवं असेल ते घ्या'

दरम्यान, संजीवन समाधी सोहळा या काळात पुणे-नाशिक महामार्गावर वारकरी दिंडी यासाठी वेगळा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

Last Updated : Nov 20, 2019, 2:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details