पुणे - जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मुळशी तालुक्याला बसला आहे. चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घरांची, झाडांची आणि विजेच्या खांबांची पडझड झाली आहे. या चक्रीवादळामुळे राजगडावरील पद्मावती देवीच्या मंदिराचे छत उडून गेले. काल(६ जून) काही शिवप्रेमी गडावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
निसर्ग चक्रीवादळामुळे राजगडावरील पद्मावती देवी मंदिराचे नुकसान - पद्मावती देवी मंदिर नुकसान न्यूज
निसर्ग चक्रीवादळामुळे राजगडावरील पद्मावती देवीच्या मंदिराचे छत उडून गेले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील गडकिल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून किल्ल्यावर कुणीच गेले नव्हते. मात्र, शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजगड परिसरातील काही शिवप्रेमी शनिवारी किल्ल्यावर गेले असता ही घटना उघडकीस आली.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील गडकिल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून किल्ल्यावर कुणीच गेले नव्हते. मात्र, शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजगड परिसरातील काही शिवप्रेमी शनिवारी किल्ल्यावर गेले असता ही घटना उघडकीस आली. किल्ल्याच्या दर्शनी भागात हे पद्मावती देवीचे मंदिर आहे. या मंदिरावरील पत्रे निसर्ग चक्रीवादळात उडून गेले असून मंदिरात पाणी साचले आहे. पुरातत्व विभागाने लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी राजे यांनीही याची दखल घेतली असून राज्य पुरातत्व खात्याचे प्रमुख तेजस गर्गे यांनी यामध्ये लक्ष घालावे. तत्काळ या मंदिराची डागडुजी करून घ्यावी अशा सूचना छत्रपतींनी दिल्या आहेत. या मंदिराचा संपूर्ण मास्टर प्लॅन बनवा. 'पैश्यांची तुम्ही काळजी करू नका. मी सांस्कृतिक मंत्री आणि त्या विभागाचे सचिव यांच्याशी बोलून हवा तेवढा निधी उपलब्ध करुन देतो', अशी पोस्ट संभाजी राजे यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.