पुणे- सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतीपर्यंत भारताचा प्रत्येक नागरिक घटनेवर चालतो. यात जगावेगळ असं काय आहे. घटनेच्या चौकटीत प्रत्येकाने वागणे अपेक्षित आहे. रस्त्याने चालताना डाव्या हाताने चालणे अपेक्षित असते. तेव्हा आपण मला कायदा माहीत नाही, असे म्हणू शकत नाही. त्यामुळे 3 वेगवेगळे पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा किमान समान कार्यक्रम ठरलेला असतो आणि अशोक चव्हाण म्हणतात, तसे काही लिहिले असेल, तर त्यावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या असतील आणि हे तिन्ही पक्षांना लागू असेल, असे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले.ते आज मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आले आहेत. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.
फेब्रुवारी अखेरीस पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात -