पुणे: वीज पुरवठा खंडित करण्याची भीती (Threat of power cut) दाखवून सायबर चोरट्याने एका महिलेची एक लाख रुपयाची फसवणूक (Cyber thief extorts Rs 1 lakh) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एका महिलेने तक्रार दिली आहे. महिलेच्या मोबाईल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. (threatening to cut off electricity), (Cyber Criminals Cheat Woman), Pune Crime, Latest news from Pune
Cyber Criminals Cheat Woman: वीज खंडित करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्याचा महिलेला एक लाखांचा गंडा - Cyber Criminals Cheat Woman
वीज पुरवठा खंडित करण्याची भीती (Threat of power cut) दाखवून सायबर चोरट्याने एका महिलेची एक लाख रुपयाची फसवणूक (Cyber thief extorts Rs 1 lakh) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एका महिलेने तक्रार दिली आहे. (threatening to cut off electricity), (Cyber Criminals Cheat Woman), Pune Crime, Latest news from Pune
ॲप डाऊनलोड करणे पडले महागात-महावितरणमधून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत चोरट्याने महिलेला वीज बिल भरले नसल्याचे सांगितले. आज रात्री नऊ वाजेपर्यंत बिल न भरल्यास वीज कापण्याची धमकीही दिली. महिलेने चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून एक ॲप डाऊनलोड मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. तिच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरट्याने घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातून एक लाख रुपयाची रोकड लंपास केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन-शहरात गेल्या काही महिन्यांपासून वीज कापण्याची भीती घालून फसवणुकीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणारे तक्रारदार जाळ्यात सापडतात. चोरट्याने ॲप डाऊनलोड करण्यास सांगितल्यानंतर मोबाईलमधील सर्व माहिती चोरट्याकडे जाते. बँक खात्याला मोबाईल क्रमांक जोडलेला असल्याने चोरटे या माहितीचा गैरवापर करून बँक खात्यातून पैसे अफरातफर करतात. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरण आणि पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.