पुणे- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात शहरातील गंभीर गुन्हेगारी कमी झाली आहे. मात्र, सायबर गुन्ह्यात कमालीची वाढ झाल्याची दिसून आले आहे. मोबाईल वापरताना नकळत होणाऱ्या चुकांमुळे सायबर गुन्ह्याचे प्रकार घडत आहेत. यावर्षी आतापर्यंत 4 हजारांहून अधिक सायबर गुन्ह्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावर्षी दाखल झालेले हे गुन्हे मागील वर्षापेक्षा 10 ते 12 टक्यांनी जास्त आहेत. यावर्षी दाखल झालेल्या तक्रारीत सोशल मीडियावरुन फसवणूक झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
सोशल मीडियावरुन फसवणुकीचे प्रमाण वाढले... फसवणूक टाळण्यासाठी करा 'या' गोष्टी
लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात बसून आहेत. या काळात मनोरंजनासाठी किंवा इतर कामासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. याचा परिणाम असा झाला की मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात व्हाॅट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा-शाब्बास..! लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला
लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात बसून आहेत. या काळात मनोरंजनासाठी किंवा इतर कामासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. याचा परिणाम असा झाला की मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात व्हाॅट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी अशाप्रकारच्या घटना कमी आहेत. मात्र, लाॅकडाऊनदरम्यान मागील तीन महिन्यात अशाप्रकारच्या 22 ते 23 तक्रारी सायबर विभागाकडे आल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिली.