पुणे - ऑनलाईन खरेदी करताना गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. पुण्यात 2018 साली अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या सुमारे 225 होती. 2019 या वर्षात ही संख्या सुमारे 800 झाली आहे.
ओएलएक्सवरून या वेबसाईट वरून खरेदी-विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या साईटवरून खरेदी-विक्री करणाऱ्यांना चोरटे सावज बनवत आहेत. पुण्यातील प्रियंका नावाच्या महिलेने घरातील जुने कपाट विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. दुसऱ्याच दिवशी कपाट घेण्यास इच्छुक व्यक्तीचा फोन आला. मात्र, पैसे केवळ फोन पे किंवा गुगल पे नेच देणार असल्याचे सांगितले. प्रियंका यांच्या मोबाईलमध्ये संबधित अॅप नव्हते. समोरील व्यक्तrने त्यांना व्हॉट्सअॅपवर अॅप पाठवून इन्स्टॉल करण्याची संपूर्ण माहिती दिली. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरवातीला 200 रुपये पाठवले. त्यानंतर प्रियंका यांच्या खात्यातील 15 हजार रुपये लंपास केले.