महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला; 5 कोटींचे नुकसान - परदेशी हॅकरने बिट कॉइनची मागणी

पिंपरीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला झाला असून यात 5 कोटींचे नुकसान झाले आहे. हा हल्ला केल्यानंतर अज्ञात परदेशी हॅकरने बिट कॉइनची मागणी केली. 27 सर्व्हरमधील डेटा इनक्रिप्ट करण्यात आला आहे.

cyber attack
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला

By

Published : Mar 10, 2021, 11:41 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरचा डेटा इनक्रिप्ट करून अंदाजे 5 कोटींच नुकसान केले असल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सायबर पोलीस करत आहेत. हा रन्समवेअर अटॅक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

27 सर्व्हर करण्यात आला सायबर हल्ला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचं समोर आले असून अज्ञात परदेशी हॅकरने बिट कॉइनची मागणी केली. 27 सर्व्हरमधील डेटा इनक्रिप्ट करण्यात आला आहे. त्यामुळे 5 कोटींचे नुकसान झाले असल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, हा डेटा परत मिळवला जाऊ शकतो असे सायबर पोलिसांनी म्हटले आहे.

डेटा इनक्रिप्ट करण्यात आला आहे...

इनक्रिप्ट केलेला डेटा डिस्क्रिप्ट केला जाऊ शकतो अस देखील पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण कामाला सुरुवात केली नव्हती. सॉफ्टवेअर लॉन्च करण्याच्या अगोदर हा सायबर अॅटॅक झाला आहे. असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले असून रेकी करून हा सायबर अॅटॅक झाल्याचं स्पष्ट झाले आहे. घटनेचा अधिक तपास सायबर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुंगार हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details