महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईल चोरल्याच्या रागातून हॉटेल मालक व वेटरने केलेल्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू - हडपसर मोबाईल चोरी न्यूज

हडपसरमध्ये एका हॉटेल मालकाने आणि वेटरने ग्राहकाला मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

dead body
मृतदेह

By

Published : Mar 14, 2021, 1:15 PM IST

पुणे -हॉटेलमध्ये इडली घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाने हॉटेल मालकाचा मोबाईल चोरला. हॉटेल मालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने आणि एका वेटरने या तरुणाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. पुण्याच्या हडपसर परिसरातील शिवशाही व्हेज नॉन-व्हेज हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

रवी दिपलू राठोड (वय 30), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल मालक दादा उर्फ अनिल अंकुश मोरे (वय 35) आणि वेटर बाबुराव रघुनाथ जाधव (वय 29) या दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी सुरेश दिपलू राठोड (वय 28) यांनी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण -

हडपसर परिसरातील गोपाळपट्टी येथे आरोपी दादा उर्फ अनिल अंकुश मोरे याच्या मालकीचे शिवशाही व्हेज नॉन-व्हेज हॉटेल आहे. मृत रवी राठोड हा गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इडली घेण्यासाठी या हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याने हॉटेल मालकाचा मोबाईल चोरला. तरुणाने मोबाईल चोरल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल मालक आणि वेटरने त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने रवी राठोडचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details