पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पुण्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे शहरात रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात प्रथमच संचारबंदी लागू केली. या काळात जर कोणी बाहेर दिसला तर त्याला स्थानबद्ध करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
सावधान पुणेकरांनो..! बाहेर दिसल्यास होऊ शकतो गुन्हा दाखल - पुणे पोलीस
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पुण्यात संचारबंदी लावण्यात आला आहे. या काळात जर कोणी बाहेर दिसला तर त्याला स्थानबद्ध करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
या काळात कोणालाही रस्त्यावर चालणे, फिरणे, फिरणे आणि उभे राहता येणार नाही. कोणत्याही एकट्या व्यक्तीला चालता, फिरता येणार नाही. जीवनावश्यक सेवा वगळता सर्वांना हा कर्फ्यु लागू आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. व्यक्तींना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्याचा त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शहरात माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : पुण्यात पाच ठिकाणी रक्तदान शिबीर; 100 हून अधिक जणांचे रक्तदान