महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू अन् आळंदीत संचारबंदी - संत ज्ञानेश्वर बातमी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोमवार 28 जूनपासून ते 4 जुलैपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. या काळात खासगी व सार्वजनीक वाहतूकही पूर्णपणे बंद असणार आहे. स्थानिक नागरिकांनाही ओळखपत्राशिवाय बाहेर वावरता येणार नाही.

आषाढी वारी
आषाढी वारी

By

Published : Jun 27, 2021, 2:30 AM IST

Updated : Jun 27, 2021, 6:44 AM IST

आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी व देहू शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून (दि. 28 जून) ते रविवारपर्यंत (दि. 04 जुलै) पिंपरी-चिंचवड पोलीसांच्या वतीने संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू अन् आळंदीत संचारबंदी

आळंदी, देहूगाव परिसरामध्ये आषाढी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संचारबंदीचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आळंदी व देहू गावच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र सोबत बाळगणे गरजेचे असणार आहे. या कालावधीत श्री क्षेत्र आळंदी व देहूगावामधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार असून गावातील धर्मशाळा, मठ, भक्तनिवास, लॉज व इतरत्र ठिकाणी भाविक व नागरिक यांना वास्तव्य करता येणार नाही.

हेही वाचा -उपमुख्यमंत्र्यांनंतर गृहमंत्र्यांनाही कोरोनाचा विसर?

Last Updated : Jun 27, 2021, 6:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details