लोणावळा - पर्यटनबंदी असतानाही शनिवार-रविवारी पुणे-मुंबईच्या पर्यटकांनी लोणावळा परिसरात गर्दी केली. यावेळी काही पर्यटकांनी मास्क घातले नव्हते, तर काही जण मुक्तसंचार करत होते; परंतु कोठेही पोलीस प्रशासन किंवा पालिका अधिकारी फिरकले नसल्याने पर्यटक नियम डावलून बिनदिक्कत फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोणावळ्यात वीकएंडमुळे पर्यटकांची गर्दी; सोशल डिस्टसिंगचा फज्जा
कोरोना महामारीमुळे सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत; परंतु आता पर्यटक मोठ्या प्रमाणावर नियम डावलून बिनधास्त पर्यटन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोना महामारीमुळे सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. मावळमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. दरवर्षी वर्षाविहारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. मात्र यावर्षी पर्यटनस्थळांवर येण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला; परंतु कोरोनासारख्या महामारीचा धोका असतानाही नागरिक सर्रासपणे लोणावळा-खंडाळामध्ये पर्यटनासाठी येत आहेत. हे पर्यटक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे लोणावळा पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.