पुणे :बटाटा हे कंदमुळ आहे, अशीच त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली उगवते. पण हे बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला येतात, तेव्हा आश्चर्य वाटते. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात चक्क झाडाला बटाटे लागले (potatoes grew above ground in Pune) आहेत.
Potatoes Grew Above Ground : पुण्यात चक्क झाडाला आले बटाटे....पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी - बटाटे आले जमिनीवर
पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात चक्क झाडाला बटाटे लागले (potatoes grew above ground in Pune) आहेत. हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले (citizens to watch potatoes grew above ground) आहेत.
बटाटे जमिनीवर आले :आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत. जमिनीत बटाटे येतात, तसेच हे बटाटे जमिनीवर आले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला चक्क १८ ते १९ बटाटे आले आहेत. हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले (citizens to watch potatoes grew above ground) आहेत.
कुतूहालाचा विषय :आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे माळरानावर संदीप आणि धनेश वळसे पाटील यांची शेती आहे. साडेतीन एकरावर त्यांनी बटाट्याची लागवड केली आहे. बटाटा पीक काढणीला आलेला आहे. अंतिम टप्प्यातील पाला काढण्याचे काम सुरू (potatoes grew above ground) आहे. या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या पिकातील एका झाडाला चक्क बटाटे आलेले दिसले. हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत आसताना आतापर्यंत अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी बटाटा चक्क जमिनीच्या वर आल्याने त्यांना आश्चर्य वाटले आहे. थंडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो. त्याचप्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे. वर बटाटा आल्याने परिसरात हा कुतूहालाचा विषय होत असून परिसरात शेतकरी हा जमिनीवर आलेला बटाटा बघण्यासाठी गर्दी करू लागले (potatoes grew in Pune) आहेत.