पुणे- लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या मूळगावी जाण्यास परवानगी देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. या नागरिकांना जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन नावनोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या नागरिकांना कोरोनासदृश्य आजार तर नाही ना याची खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रही अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी उत्सुक असणारे नागरिक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत.
गावाची ओढ..! पुण्यात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी - पुणे कोरोना बातमी
पुण्यातील वेगवेगळ्या भागात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत. त्यांनाही आपल्या गावाची ओढ लागली आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांनी आज सकाळपासून पुण्यातील कमला नेहरू रूग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
पुण्यातील वेगवेगळ्या भागात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत. त्यांनाही आपल्या गावाची ओढ लागली आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांनी आज सकाळपासून पुण्यातील कमला नेहरू रूग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून हे नागरिक तपासणीसाठी आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत आहेत.
दरम्यान, पुणे विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 364 वर पोहोचली आहे. तर 558 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 1 हजार 681 आहे. आतापर्यंत 124 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 86 रुग्ण गंभीर असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे.