पुणे- साप दिसला की अनेकांची पाचावर धारण बसते. पण, जर तोच साप प्रणय क्रीडेत बेभान असल्यास अनेक जण ते पाहण्यासाठी गर्दी करतात. असाच एक प्रकार पुण्यात बुधवारी (दि. 11 मार्च) सायंकाळी घडला.
पुण्यातील नदीपात्रात सापांचे मिलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
पुण्यातील डेक्कनच्या नदीपात्रात बुधवारी (दि. 11 मार्च) सायंकाळी नागरिकांनी सापांचे मिलन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
पुण्यातील डेक्कनच्या नदीपात्रात बुधवारी (दि. 11 मार्च) सायंकाळी नागरिकांना हे अनोखे दृश्य पाहायला मिळाले. मिलनात बेभान झालेल्या सापाच्या जोडीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होते. गवतात, झुडपात होत असलेले दुर्मिळ मिलन पाहायला पुणेकरांची गर्दी झाली होती. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सापाच्या नर आणि मादींचा संक्रमण काळ असतो. 60 ते 65 दिवसात मादी अंडी देते आणि 60 दिवसानंतर पिल्लांचा जन्म होतो. नर आणि मादीच्या मिलनानंतर एकुण 120 दिवसात प्रजनन होते. नदी पात्रात आढळलेली ही जोडी धामण जातीचे साप असावे, असे सर्प मित्र सांगतात. उंदीर खाणारा, शेतकऱ्यांचा मित्र म्हणून धामण साप ओळखला जातो. तो बिनविषारी असतो त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, तसेच सापांचे मिलन पाहू नये, अशी अंधश्रद्धा देखील आहे. मात्र, यात घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सर्पमित्र सांगतात.
हेही वाचा -गाव सोडून जा..! कोरोनाग्रस्त रुग्णाच्या भावाला ग्रामस्थांची तंबी