पुणे - जिल्ह्यातील मंचर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी १ मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी झटपट 'कोविन'वर नाव नोंदवत लसीकरण केंद्रावर धाव घेतल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र, नाव नोंदणी झाल्यानंतर येणाऱ्या पुढील संदेशाची (लसीकरण तारीख) वाट न बघताच लसीकरण केंद्रावर लोकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली.
राज्यात शनिवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पण अनेक लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशीच परिस्थिती उत्तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खेड, प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर आणि उपजिल्हा रुग्णालय मंचर या रुग्णालयाबाहेर दिसून आली. ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे. अशांना नियमानुसार कोविन या अँपच्या माध्यमातून ऑनलाइन नाव रजिस्टर करावे लागत आहे. त्याप्रमाणे नोंदणीही केली जात आहे. मात्र नाव नोंदणी होताच पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यात काही नाव नोंदणी न करताच लस घेण्यासाठी दाखल1 होते.