शिरुर(पुणे)- राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. खबरदारी म्हणून सरकारने सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमणार यासाठी काही नियमे घालून दिली आहेत. या नियमाची पायमल्ली करुन तालुक्यातील मोराची चिंचोली येथे लग्न समारंभ पार पडला. पोलिसांनी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लग्नात डीजे लाऊन जमवली गर्दी.. 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
कोरोनाच्या महामारीच्या संकटात शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली गावात २५ जून रोजी झालेल्या लग्न समारंभात नियमांची पायमल्ली करुन लग्न समारंभ साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या महामारीच्या संकटात शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली गावात २५ जून रोजी झालेल्या लग्न समारंभात नियमांची पायमल्ली करुन लग्न समारंभ साजरा करण्यात आला. त्यामुळे शिरुर पोलीसांनी वधू-वर कुटुंबासह लग्न समारंभात सहभागी झालेल्या २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती, पोलीस निरिक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली. समारंभ सोहळ्यात सहभागी नागरिकांनी मास्क घातले नव्हते, सोशल डिस्टसिंगचा फज्ज उडवर गर्दी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.