पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. दररोज आठशे पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी कोरोनाची नियमावली जाहीर केली असून त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. दररोज भाजी मंडईमध्ये हजारो नागरिक येतात. आज मात्र, उलट चित्र होते. विक्रेते जास्त आणि ग्राहक कमी होते. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी केली नाही हे प्रशासनाच्यादृष्टीने दिलासादायक आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजी मंडई गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे दररोज आढळतात शेकडो बाधित रुग्ण -
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेकडो बाधित रुग्ण आढळत असून काहींचे मृत्यूही होत आहेत. दरम्यान, शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी कोरोना संदर्भातील नवीन नियमावली जाहीर केली. त्यात भाजी मंडई सारख्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क वापरावे, असे सांगण्यात आले आहे. अतिशय गरजेच्या कामाशिवाय नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
आयुक्तांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद -
नागरिकांनी आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. पिंपरी भाजी मंडईमध्ये आज(शनिवार) अत्यंत कमी गर्दी होती. विक्रेते जास्त आणि ग्राहक कमी असे, म्हटले तरी वावग ठरणार नाही.
नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल.