पुणे- गेल्या दहा-बारा दिवसांपासून शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे. मोठ्या भांडवली खर्चातून उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुण्याच्या मांडवगण फराटा परिसरात परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी - मांडवगण फराटा अवकाळी पाऊस
खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके तर रब्बी हंगामातील लागवड केलेली पिके परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहे. डोळ्यासमोर शेतीचे होणारे नुकसान पाहून शेती करायची तरी कशी? असा प्रश्न परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

सध्या सर्वत्र रब्बी हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. तर, काही प्रमाणात भाजीपाला आणि इतर रब्बी पिके लागवडीखाली आहेत. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोठ्या भांडवली खर्चातून उभी केलेली पिके पाण्याखाली जाऊ लागल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानाची सरकारच्या माध्यमातून वेळीच भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकरी शेतात काबाड कष्ट करतोय. मात्र, त्याच्या कष्टाची डोळ्यासमोर माती होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे करुन कागद रंगवले जात आहेत. मात्र, या नुकसानीची भरपाई नक्की कधी मिळणार, हे कोणीच सांगायला तयार नाहीत.