पुणे - जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जात आहे. ड्रोनद्वारे फवारणीची शेतामध्ये औषध फवारणीची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. नाशिक येथील एका कंपनीने शेतामध्ये ड्रोनद्वारे औषध फवारणीचा हा प्रयोग केला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी ही हायटेक फवारणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
शेतामध्ये ड्रोनद्वारे होतेय औषध फवारणी; शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड हेही वाचा -पुणे मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी, सुमारे 500 मीटर धावली मेट्रो!
शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली कि त्यातून वेळ, पैसा, मेहनतीची बचत होते. अशाच प्रकारचे नवे तंत्रज्ञान आता शेताच्या बांधावर आले आहे. ड्रोनचा वापर विविध कामांसाठी केला जात असताना शेतकरीही आता आपल्या शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करू लागला आहे.
हेही वाचा -पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारेंची बिनविरोध
कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी पैशात या ड्रोनद्वारे फवारणी केली जाते. या नव्या तंत्रज्ञानामुळे ऊस, कांदा,फ्लॉवर, पालेभाज्या, डाळिंब या पिकांवर अगदी काही मिनिटांत फवारणी होत आहे. याशिवाय सूक्ष्म पद्धतीने पिकावर सर्वत्र फवारणी होत असल्याने याचा चांगलाच फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 10 लिटर क्षमता असलेल्या या ड्रोनमधून एकाचवेळी एकसारखी फवारणी होते. फवारणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी 800 रुपये घेतले जातात. आता हीच फवारणी मजुरांकडून करून घेतल्यास तेवढाच खर्च येतो पण वेळ जास्त लागतो शिवाय फवारणी एकसारखी होत नाही. परंतू या तंत्रज्ञानामुळे काही मिनिटात फवारणी पूर्ण होते.
हेही वाचा -कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर जाण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार
शेतकरी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन प्रगत शेतीकडे वाटचाल करु लागला आहे. त्यामुळे त्याचा वेळ, पैसा, मेहनत वाचवून चांगले उत्पादन मिळण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये या ड्रोन फवारणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.