खेड/पुणे -खेड तालुक्यात कोरोना महामारीचे भिषण संकटाचे विदारक वास्तक चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच समोर आणल. उपचारादरम्यान रुग्णांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. डॉक्टरांनीच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थिति केले आहेत.
चांडोली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विदारक अवस्था - कोरोना बातमी
खेड तालुक्यात कोरोना महामारीचे भिषण संकटाचे विदारक वास्तक चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच समोर आणल. उपचारादरम्यान रुग्णांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. डॉक्टरांनीच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थिति केले आहेत.
![चांडोली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विदारक अवस्था चांडोली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विदारक अवस्था](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11474531-thumbnail-3x2-chandoli.jpg)
चांडोली ग्रामीण रुग्णालयात 45 ऑक्सिजन बेडवर 46 रूग्णांवर उपचार सुरु असुन आज सकाळी एका रुग्णाचा मृत्यू झालाय मात्र मेल्यानंतरही रुग्णांना यातना सहन कराव्या लागत आहेत. मात्र प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक आपली जबाबदारी टाळत असल्याचाच गंभीर आरोप डॉ प्रविण इंगळे यांनी केला आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात राज्य सरकार मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयातील हे विदारक चित्र असेल तर मृत्यूदर कसा रोखणार असा प्रश्न डॉक्टरांनीच उपस्थीत केलाय.
हेही वाचा -मराठी सिनेसृष्टीत 'सन्नाटा' : ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे करोनामुळे निधन