महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Santosh Jadhav : स्वतःची ओळख लपविण्यासाठी संतोषने केले होते मुंडण - एडीजी सरंगल - स्थानिक गुन्हे शाखा

संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी ( Sharp Shooter Santosh Jadhav Arrested ) यांना काल रात्री गुजरातमधून अटक केल्यानंतर एडीजी कुलवंत के सरंगल ( कायदा व सुव्यवस्था ) यांनी आज ( ADG Kulwant Sarangal Pc In Pune ) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, संतोष जाधव हा आपली ओळख लपवण्यासाठी मुंडण करुन पेहरावा बदलला होता.

संतोष
संतोष

By

Published : Jun 13, 2022, 2:24 PM IST

पुणे- संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी ( Sharp Shooter Santosh Jadhav Arrested ) यांना काल रात्री गुजरातमधून अटक केल्यानंतर एडीजी कुलवंत के सरंगल ( कायदा व सुव्यवस्था ) यांनी आज ( ADG Kulwant Sarangal Pc In Pune ) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, संतोष जाधव हा आपली ओळख लपवण्यासाठी मुंडण करुन पेहरावा बदलला होता.

पोलिसांसमोर होते मोठे आव्हान -संतोष सुनिल जाधव (रा. मंचर) याने त्याचे साथिदारांसह मिळून ओंकार ऊर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याचा पिस्तुलमधून गोळीबार करून दीड वर्षापूर्वी एकाची हत्या केली होती. योप्रकरणी मंचर येथे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने संतोष जाधव याला फरार घोषित केल्यानंतर त्याच्या अटकेसाठी वॉरंटही काढण्यात आले होते. संतोष हा विविध राज्यात सतत फिरत असल्यामुळे त्याची माहिती काढून त्याच्या मुसक्या आवळण्याचे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष सुनिल जाधव यास फरार कालावधीत आसरा दिल्यामुळे सौरभ ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे यास अटक केलेली होती. सौरभ ऊर्फ महाकाल याच्याकडून माहिती काढून संतोष जाधव याला पकडण्यासाठी विविध पथक विविध राज्यात पाठविण्यात आले होते.

अशा आवळल्या संतोषच्या मुसक्या - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास संतोष सुनिल जाधव हा त्याचा मित्र नवनाथ सुरेश सुर्यवंशी ( रा. मांडवी, जि. भुज, राज्य गुजरात ) यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ मांडवी, गुजरात येथे धाव घेतली. तेथे त्यांना नवनाथ सुर्यवंशी हा मिळून आला त्याच्याकडे संतोष जाधवबाबत विचारपूस केली असता सुरुवातीस त्याने माहिती दिली नाही. पण, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संतोष हा नागोर (ता. मांडवी, जि. भुज, गुजरात) येथे असल्याची माहिती दिली. त्यावरुन त्या ठिकाणी जाऊन संतोषच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संतोष जाधवने ओळख लपविण्यासाठी स्वतःचे मुंडण केले व पेहरावा बदलला होता. पण, पोलिसांनी त्याच्यासह त्याला आश्रय देणाऱ्या नवनाथ सुर्यवंशी याचेही मुसक्या आवळल्या आहेत.

संतोष जाधव बिष्णोई गँगचा राज्यातील प्रमुख -संतोष जाधव आणि सौरभ महाकाल या दोघांनाही पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती. पंजाब येथील बिष्णोई टोळीचा संतोष हा सदस्य होता. तो मंचर येथील गुन्ह्यांनंतर बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. संतोष हा बिष्णोई टोळीचा राज्यातील प्रमुख होता. त्याच्या संपर्कात सौरभ महाकाल हा होता, अशीही माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

असा झाला बिष्णोई गँगशी संपर्क -बिश्नोई टोळीचा म्होरक्या विक्रम ब्रार याच्या संपर्कात संतोष हा मंचर येथील गुन्ह्यानंतर आला होता. त्यानंतर संतोषच्या संपर्कात सौरभ महाकाल हा होता. मंचर येथील गुन्ह्यानंतर फरार असताना या तिघांनी हरयाणा, पंजाब आणि रजेस्थान येथे रेकी केली.आणि तेथून सातत्याने संतोष हा विविध राज्यात फिरू लागला.

संतोषची भूमिका काय - सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण तसेच सलमान खान धमकी प्रकरणात संतोष जाधव याची नेमकी भूमिका काय होती याबाबत पुणे पोलीस तपास करत आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या सौरव महाकालच्या माध्यमातून संतोष जाधवची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यानुसार नियोजन करून विविध राज्यात पथक पाठवून संतोष जाधव याला अटक केली आहे.

हेही वाचा -Santosh Jadhav Arrest : संतोष जाधव अटक प्रकरणी एडीजी कुलवंत सरंगल यांची पत्रकार परिषद, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details